Sunday, December 22, 2024
Homeराज्यमुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्यासाठी “लेक लाडकी योजना” प्रभावीपणे राबवा - महिला व...

मुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्यासाठी “लेक लाडकी योजना” प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे…

नांदेड – महेंद्र गायकवाड

मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे या उद्देशाला साध्य करणारी “लेक लाडकी योजना” शासनाने आणली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना महत्त्वपूर्ण म्हणून पाहिली जाते. 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्माला आलेल्या दोन मुलीसाठी ही योजना अनुज्ञेय आहे.

मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, इयत्ता पहिलीत मुलगी गेल्यावर 6 हजार, सहावीत गेल्यावर 7 हजार, अकरावीत 8 हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये असे एकुण 1 लाख 1 हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते. ही योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

श्रीक्षेत्र माहुरगड येथील श्री रेणुका देवी, श्री दत्त शिखर संस्थान येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या योजनांबाबत आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, जिल्हा माहिला व बालकल्याण विकास अधिकारी रमेश कांगणे व इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी पोषण माह, बेटी बचाओ-बेटी पढाओ, माझी मुलगी माझा अभिमान याबाबत माहिती घेतली. महिला बचतगटाच्या माहूरगड येथील स्टॉलला त्यांनी भेट दिली.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: