मध्यप्रदेशात 4 वेळा मुख्यमंत्री राहून गेलेले माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची राज्यात बरीच लोकप्रियता असल्याचे दिसून आले आहे. म्हणूच MP निवडणुकीत BJP ने मोठी बाजी मारली आहे. मोहन यादव हे लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या महिला समर्थकांची भेट घेतली तेव्हा भेट घेणाऱ्या महिलांचे सर्वांचे डोळे पाणावले. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये शिवराज महिलांमध्ये उभे राहून लोकांना समजावताना दिसत आहेत, मात्र तिथे उपस्थित असलेले लोक शिवराज यांना मुख्यमंत्री न करण्याचा निर्णय मानायला तयार नाहीत.
एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला ‘तुम्ही सर्वांचे आवडते, प्रत्येक बहिणीचे आवडते’ असे म्हणताना दिसत आहे. त्या महिला पुढे म्हणतात, ‘आम्ही तुम्हाला सोडणार नाही.’ तर यावर शिवराज सिंह म्हणतात, ‘मी कुठे जातोय, मीही सोडणार नाही.’
मामा, तुम्ही खूप कष्ट केलेत…
व्हिडिओमध्ये महिला म्हणताना ऐकू येत आहे की, ‘मामा, तुम्ही खूप मेहनत केली आणि आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत केली आणि तुम्ही जिंकलात. भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केले.
मी समाधानी आहे- शिवराज
शिवराज सिंह म्हणाले, ‘आज जेव्हा मी येथून निरोप घेत आहे, तेव्हा मला समाधान आहे की 2023 मध्ये पुन्हा एकदा भाजपने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले. माझे मन आनंदाने आणि समाधानाने भरले आहे. ते पुढे म्हणाले, ‘मला विश्वास आहे की सीएम मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार राज्यात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करेल… प्रगती आणि विकासाच्या बाबतीत मध्य प्रदेश नवीन उंची गाठेल. मी त्यांना पाठिंबा देत राहीन.
#WATCH | Bhopal: Former Madhya Pradesh Chief Minister and senior BJP leader Shivraj Singh Chouhan meets women supporters.
— ANI (@ANI) December 12, 2023
(Source: Shivraj Singh Chouhan's office) pic.twitter.com/oWlHYUYlpJ