Sunday, December 22, 2024
Homeराज्यजिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्या हस्ते स्वामी समर्थ मंदिराचे भूमिपूजन…

जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्या हस्ते स्वामी समर्थ मंदिराचे भूमिपूजन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

फुलचुर जिल्हा परिषद क्षेत्रातील फुलचुर टोला येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरातील गट्टू बांधकामाचे भूमिपूजन दिनांक 10 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले.

फुलचुर टोला येथील स्वामी समर्थ महाराज मंदिराच्या गट्टू बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी या भागातील नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांच्याकडे केली होती.

त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा विकास निधीतून गट्टू लावण्यासाठी 3 लाखांचा निधी मंजूर करून दिला. या मंजूर असलेल्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख कल्पना दिओतरे, आलोक पव, हर्षल बिसेन, कुणाल हरिनखेड़े मुकुल बिसेन, श्री स्वामी समर्थ सेवेकरी शिवरानी शेलोकर,

रिता चौरवाहे,उषा वाढवे, मीरा , बुरडे ताई,अश्विनि वाढीवे, रोडे, उगले, शीतल ठाकरे, राहुल मगणानी, पूजा आशिष सोनटक्के, आशिष सोनटक्के, शेलोकर, सरपंच उसाताई बावनकर, उपसरपंच दिनेश चित्रे, कोमल धोटे,कलाम खान, जीवन बनसोड,मोहित इटानकर, लोकेश उपराडे, संदीप धोटे आदी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: