Friday, January 3, 2025
Homeराज्यनरखेड येथे विस्तारीत कार्यकारणीची घोषणा...

नरखेड येथे विस्तारीत कार्यकारणीची घोषणा…

नरखेड – अतुल दंडारे

दि. 09/12/2023 रोज शनिवार ला बालपांडे सभागृह, सावरगाव येथे जिल्हाअध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी जिल्हाअध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आमदार आशीष देशमुख, काटोल विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकुर, नागपुर जील्हा महामंत्री दिनेश ठाकरे, शामराव बारई, मनोज कोरडे, उकेश चव्हाण, जी. प. सदस्य पार्वताबई काळबांडे स्वप्नील नागापुरे, दिलीप तांदळे, प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष दिलेश ठाकरे यांच्या हस्ते विस्तारीत कार्यकारणी चि घोषणा करण्यात आली.

त्यावेळी संपुर्ण तालुक्यांतील भाजप चे बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद मध्दे मोठ्या मतधिक्याने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी संपुर्ण नरखेड तालुका भाजप पदाधिकारी मेहनत घेईल व नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठया प्रमाणात आपल्या बाजूने निकाल लागला तसाच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद मध्ये सुध्दा भाजप चा झेंडा रोवु हा विश्वास तालुका अध्यक्ष दिलेश ठाकरे यांनी दिला. तसेच उपास्थित झालेल्या ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: