गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना गोंदिया जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत…
या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंदयावर, छापे टाकून प्रभावी धडक कारवाई करण्यात येत आहे. वरिष्ठांचे आदेश निर्देशाप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा प्रमोद मडामे, पोलीस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली गंगाझरी परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध आणि गुन्हेगारी प्रवूत्तीच्या इसमांविरूद्ध प्रभावी कारवाई करण्यात येत आहे ….
पो.स्टे.गंगाझरी येथील पोलीस अंमलदार यांनी दिनांक – 05/12/ 2023 रोजी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा शहारवाणी, ता. गोरेगांव, जि. गोंदिया येथील शेतशिवार परिसरात जमिनीत खड्डा खोदून त्याची चूल तयार करून, त्या चुलीवर मोठी जर्मन करची व त्यावर एक मोठे जर्मन ठेवून मोहाफुलाची हातभट्टी दारू काढत असल्याचे मिळून आले.
सदर ठिकाणी पोलिसांनी रेड कार्यवाही करून घटनास्थळावरून 02 जर्मन करची, 01 लाकडी टवरा, एक प्लास्टिक पाईप, 300 किलो सडवा मोहपास प्लास्टिक पोतडीतील सडवा मोहोपास 8 टिनाचे पिपे, 60 लिटर मोहाफुलाची हातभट्टी दारू असा एकूण 36,500/- रुपयेचा माल मिळुन आला.
सदर प्रकरणी पो.स्टे. गंगाझरी येथे अविनाश माणिकचंद मौजे, वय 21 वर्ष, रा. मौजा शहारवाणी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया यांचेविरुद्ध अपराध. क्र. 486/2023 कलम 65(ब) (क)(ड)(ई )(फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. गंगाझरीचे पो.नि. महेश बनसोडे, पो.ना.महेंद्र कटरे/1706, पोशि प्रशांत गौतम/1093 यांनी केली.