सांगली – ज्योती मोरे
कर्नाटकचे काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात मिरजेतील गांधी चौकात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शना करून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
काँग्रेसचे कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज मिरजेतील गांधी चौकात भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं,महाराष्ट्र प्रदेश सचिव सागर वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख मोहन वनखंडे, भाजप नेते मकरंद देशपांडे,
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या उपस्थितीत जोरदार निदर्शनं करत खर्गे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून तो जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र यावेळी पोलिसांनी विरोध केल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात झटापट झाली.