Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीCrime News | डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वतःही गळफास...

Crime News | डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वतःही गळफास लावून घेतला…

Crime News : उत्तर प्रदेशातील लालगंज येथील मॉडर्न रेल कोच फॅक्टरी येथील सरकारी निवासस्थानी पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टरने गळफास लावून घेतला. दोन दिवसांपासून बंद असलेल्या शासकीय घराचा दरवाजा मंगळवारी रात्री तोडण्यात आल्याने ही खळबळजनक घटना उघडकीस आली. डॉक्टरांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

डॉक्टरांची पत्नी आणि मुलगा, तर मुलगी स्वतंत्र बेडवर पडलेली आढळली. एसपी आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले की, तपासणीत प्रथमदर्शनी असे दिसते की डॉक्टरने आधी पत्नी आणि मुलांची हत्या केली आणि नंतर गळफास लावून घेतला.

मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरी (एरेडिका) कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये डीएमओ म्हणून तैनात असलेल्या नेत्रचिकित्सक डॉ. अरुण सिंग (45) यांचा मृतदेह त्यांच्या अधिकृत निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बेडवर पत्नी अर्चना, मुलगी आदिवा (१२) आणि मुलगा आरव (४) यांचे मृतदेह पडलेले आढळले.

दोन दिवसांपासून डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय घराबाहेर दिसले नाहीत. निवासस्थानाचा दरवाजाही आतून बंद होता. संशयास्पद वाटल्याने आजूबाजूच्या लोकांनी मंगळवारी रात्री उशिरा पोलीस आणि आरपीएफला माहिती दिली. सीओ महिपाल पाठक आणि गुन्हे निरीक्षक पंकज त्यागी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी निवासस्थानाचा दरवाजा तोडला. पोलीस आतमध्ये पोहोचले तेव्हा डॉक्टरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

डॉ. अरुण हे मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार भागातील फरहाना गावचे रहिवासी होते. एसपी आलोक प्रियदर्शी म्हणाले की, फॉरेन्सिक टीम तपास करत आहे. त्यांनी सांगितले की, डॉक्टर बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे कर्मचाऱ्यांकडून समोर आले आहे. सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. पीएम रिपोर्ट आल्यानंतरच चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: