रामटेक – राजु कापसे
कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये महिला पखवाडा निमित्य लैंगीक शोषण व
लिंगभेद अत्याचाराबाबत जनजागृती कार्यक्रम 4 डीसेंबरला कालिदास सेमिनार हाल मध्ये आयोजित केला गेला.
प्रमुख वक्ता म्हणून डॉ. हर्षा अंबिलडुके होत्या. अध्यक्षता प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यानी केली। या वेळी प्रामुख्याने किट्सच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची सदस्या प्रा. सरोज शंभरकर व डॉ गजानन शर्मा सहित इतर सदस्य,विभाग प्रमुख, डीन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संखेत उपस्थित होते.
डॉ. हर्षा आंबिलडुके मार्गदर्शनपर म्हणाल्या की बरेच ठीकाणी कार्यस्थळी महिलांचे लैंगीक शोषण व अत्याचार होण्याच्या धोका असतो, महिलानी सावधगिरी पाळावी. तसेच कार्यस्थली लिंग भेद नसावा. महिलांनी लगेच त्यांची तक्रार आपले वरिष्ठ यांचे कडे करावी.
प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की महिलांनी जागरुक असायला पाहिजे. महिला अत्याचार विरोधात सरकारने कठोर कायदे तयार केलेत त्याच ज्ञान असावं… कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. रसीका रेवतकर यांनी केले.