पत्नीची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला…
टिटवाळा (कल्याण ) – प्रफुल्ल शेवाळे
पती पत्नीची पवित्र नाती पैशाच्या मोहा पायी एका विचित्र परिस्थिती मध्ये जाऊन थबकली जातात.. अशाच एका परिस्थिती मध्ये कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात एका पतीने स्वतःचा आयुष्यभराच्या साथीदाराला अमानुषपणे संपवले आहे.
कल्याण जवळच्या टिटवाळा शहरात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने हत्या करून पत्नीचा मृतदेह ड्रममध्ये भरून जंगलात फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पत्नीच्या डोक्यात फावड्याचा दांडा टाकून, तिची गळा आवळून हत्या केली.
अलीमुन अन्सारी (वय 35) असं मृत महिलेच नाव आहे. तर मैनोद्दीन अन्सारी असं आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. सदरच्या घटनेने टिटवाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे वडील फिर्यादी मोहमंद इंद्रीस सुबेदार खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मैनोद्दीन अन्सारी याचं 2012 मध्ये अलीमुन अन्सारी यांच्याशी लग्न झालं होतं. दोघांना 11 वर्षांचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर मैनोद्दीन आपल्या पत्नीसोबत चांगलं वागत होता.
पण गेल्या तीन वर्षांपासून तो पत्नीला आपल्या माहेरच्यांकडून रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आण, असा तगादा लावत होता. तो पैशांसाठी सातत्याने पत्नीला मारहाण करायचा. शेवटी अलीमुनच्या आई-वडिलांनी 80 हजार रुपये दिले. पण तरीही तो सातत्याने अलीमुनच्या मागे पैशांसाठी लागत होता.
दरम्यान आरोपीने मृत महिलेच्या आईला हत्येची माहीत दिल्याचे उघड…
“मृतक महिलेची आई हकीमुन यांनी सोमवारी (4 डिसेंबर) मुलीला फोन केला. पण मुलीने फोन उचलला नाही. त्यामुळे हकीमुन यांनी दुपारी एक वाजता जावायाला फोन केला. यावेळी जावायाने धक्कादायक माहिती दिली. मी अलीमुन हिचा खून करून तिला जंगलात फेकून दिलंय. आता मी पोलीस ठाण्यात जातोय”, असं जावायाने हकीमुन यांना सांगितल्याची माहिती महिलेच्या वडिलांनी फिर्यादीत दिली आहे.
घडलेली सदर घटना माझ्या नातेवाईकांना सांगून माझी पत्नी हकीमुन, मुलगा अहमद, माझा मोठा भाऊ मोहमंद हदीस खान आणि इतरांसह कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आलो, त्यावेळी पोलीसांकडून समजले की, पोलीस मैनुद्दीन याला घेवून नाळींबी गावाकडे घडलेल्या हकीगतीची खात्री करण्यासाठी गेले आहेत.
पोलिसांकडून मला माहिती देण्यात आली की, नाळींबी गावाच्या शिवारात, नाळींबी ते अंबरनाथ दरम्यान जंगलातील रोडच्या कडेला काळ्या रंगाचे झाकण असलेल्या निळ्या रंगाचा ड्रममध्ये माझ्या मुलीचा मृतदेह सापडला आहे”, असं फिर्यादी वडिलाने सांगितलं आहे.