सांगली – ज्योती मोरे.
सांगलीतील मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या रिलायन्स ज्वेल्स या ज्वेलरी शोरूम वर भर दिवसा दरोडा टाकून सुमारे 6 करोड रुपयांचे दागिने लंपास केलेल्या आरोपींपैकी त्यांचा म्होरक्या सुबोधसिंग ईश्वर प्रसाद सिंग.राहणार – चिश्तीपूर थाना चंडी, जिल्हा- नालंदा,बिहार यास सांगली पोलिसांनी बिहार मधील आदर्श सेंट्रल जेल बेऊर मधून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सदर आरोपी हा बिहार मधील पाटणा बेऊर कारागृहात शिक्षा भोगत असतानाही मोबाईल द्वारे, इंटरनेट आणि फेसबुक मेसेंजर द्वारे व्हिडिओ कॉल,व्हाईस ओव्हर इंटरनेट कॉल द्वारे जेल बाहेरील साथीदारांना गुन्हा करण्याबाबत मार्गदर्शन करुन दरोडे घडवून आणत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सदर दरोड्यावेळी सुबोध सिंग हा व्हिडिओ कॉल द्वारे साथीदारांना मार्गदर्शन करत असल्याचे यामध्ये निष्पन्न होऊन सदर कटाचा प्रमुख सूत्रधार तोच असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत त्याच्यावर संपूर्ण देशाय 32 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, यामध्ये आरोपींचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यास विश्रामबाग पोलिसांचे पथकाने स्थानिक कोर्टात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बेऊर जेलमधून त्यास ताब्यात घेतले आहे.
त्यास न्यायालयासमोर हजर केला असता,पोलीस कस्टडीचे आदेश देण्यात आले आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे हे करत आहेत. सदरची, कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव,
पोलीस निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस उप निरीक्षक पठाण, पोलीस उप निरीक्षक काझी, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरव, सागर लवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरगुप्पी,चव्हाण,साळुंखे, पाटील,देशींगकर,कानडे, घस्ते आदीं केली.