सांगली – ज्योती मोरे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती करिता शासनाच्या विविध रोजगार निर्मिती योजनांचा लाभ घेण्यासाठी व उद्योग व्यवसाय उभारणी करिता शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रोजगार मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. रोजगार मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतीनी मोठ्या संख्येने या रोजगार मेळाव्यास उपस्थिती लावली होती.
तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतात याबाबत मार्गदर्शन करून व्यवसाय कसा करावा आणि प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या यशस्वी उद्योजकांनी आपल्या व्यवसाय चे रहस्य तरुणांसमोर मांडले. शासनाच्या वतीने आलेल्या अधिकाऱ्यांनी तरुण-तरुणींना शासनाच्या विविध रोजगार निर्मिती योजनेचा लाभ कसा घेता येईल याचे मार्गदर्शन केले. या रोजगार मेळाव्यात सांगली जिल्ह्यातून आलेल्या ८०० हून अधिक बेरोजगार युवक व युवतीने अर्ज केले आहे.
याच्या व्यतिरिक्त अजून कोणालाही या बेरोजगार मेळाव्यात सहभागी व्हायचा आहे त्यांनी सांगली जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, सुनील पवार, रावसाहेब घेवारे, सुनीता मोरे, रुक्मिणी आंबिगीर, माधव गाडगीळ, उमाकांत कार्वेकर, अमोल पाटील, समीर लालबेग, महादेव सातपुते, सागर मलगुंडे, किरण राजपूत, संदीप ताटे, सूरज कसलीकर, आकाश माने, महादेव सावंत, प्रविण पाटोळे, श्रीमंत भाजगी हे उपस्थित होते.