सांगली – ज्योती मोरे
महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या मान्यतेने आणि बर्ड सॉंग एज्युकेशन रिसर्च आणि पब्लिकेशन क्लब सांगलीच्या पुढाकाराने 36 वे महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलन 23 आणि 24 डिसेंबरला शांतीनिकेतन लोक विद्यापीठाच्या निसर्गरम्य प्रांगणात संपन्न होणार असून त्याला जोडूनच 22 डिसेंबरला पक्षांची भाषा या विषयांवर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदही होणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजन कमिटीचे अध्यक्ष शरद आपटे यांनी आज शांतिनिकेतन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान, सदर संमेलनाचे उद्घाटन पश्चिम घाट पर्यावरण आणि संरक्षक राजेंद्र केरकर यांच्या हस्ते होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि संवर्धक माजी मानद वन्यजीव रक्षक तथा महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य अजित ऊर्फ पापा पाटील हे असणार आहेत.
तर ज्येष्ठ वन्य जीव अभ्यासात BNHS चे संचालक आणि सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक किशोर रिठे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सदर,संमेलनात भारती विद्यापीठाचे पर्यावरण शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ.इरच भरूचा, फिदर लायब्ररीच्या संस्थापिका ईशा मुन्शी, आयसर पुण्याचे श्रेयस माणगावे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या दोन दिवसीय संमेलनात पिसे व पिसारा या प्रमुख विषयांवर सादरीकरणे, शोध निबंध विद्यार्थ्यांची शोध निबंध ज्येष्ठ पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक शरद आपटे यांच्यावरील एफ टी आय पुणे यांनी तयार केलेला लघुपट, सहली, वृक्षदिंडी, प्रदर्शने, पुस्तक प्रकाशन अशा कार्यक्रमांची रेलचल असणार आहे.
दरम्यान 22 डिसेंबरला पक्षांची भाषा या विषयावरील परिषदेत डॉक्टर इरच भरूचा, किशोर रिठे, ईशा मुंन्शि, शरद आपटे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पक्षी प्रेमींनी आणि पक्षी मित्रांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संमेलनाच्या आयोजन कमिटीचे अध्यक्ष शरद आपटे यांनी केले आहे. यावेळी आयोजन कमिटीच्या उपाध्यक्षा डॉक्टर नंदिनी पाटील, कार्यवाह श्रीकृष्ण कोरे, खजिनदार विश्वनाथ माडोळी आदी मान्यवर उपस्थित होते