Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहिला प्रदेशाध्यक्षा रोहिनीताई खडसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...

महिला प्रदेशाध्यक्षा रोहिनीताई खडसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

मूर्तिजापूर दि. १ डिसें.: वाढदिवसाला “बुके नको, बुक द्या” या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आ. रोहिनीताई खडसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समशेरपूर ता. मूर्तिजापूर येथील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून व मिठाई भरवत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी गीत गाऊन रोहिनीताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ सुषमा जयकिरण कावरे यांच्यातर्फे स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समशेरपूर ता. मुर्तिजापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाळेतील बाळगोपाल, शिक्षकवृंद, गावकरी महिला भगिनी, महिला आघाडीच्या व पक्षाच्या विविध नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समशेरपूर गावच्या सरपंच सौ. मीनाताई वानखडे तर प्रमुख उपस्थिती रामकृष्ण गावंडे, जिल्हा महासचिव आनंद वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव वाहूरवाघ,

सामाजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष कोकिळा वाहूरवाघ, महिला महासचिव मनीषा महल्ले, महिला जिल्हा सदस्य पवित्रा जाधव, मुर्तिजापूर महिला तालुकाध्यक्ष रंजना सदार, अकोला महिला ता.अध्यक्षा संगिता दाळू,महिला ता.उपाध्यक्ष अनिता शिंगनाथ गजानन वाकोडे, योगेश सोनोने, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष अक्षय भगेवार,

ओबीसी तालुकाध्यक्ष विष्णू लोडम, संजयभाऊ वानखडे, अरविंदभाऊ आटोटे, विष्णुभाऊ खोत,ग्रा.पं.सदस्य अनुराधा थोप,ज्योत्स्ना थोप यांची होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रकाश रेवस्कर सर, इर्शाद खान सर, शिलाताई गावंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला जिल्हाध्यक्ष सौ सुषमा कावरे यांनी व सूत्र संचालन विष्णू लोडम यांनी आपल्या बहारदार शैलीत केले तर जिल्हाभरातील महिला पदाधिकाऱ्यांचे आयोजनाकरिता सहकार्य मिळाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: