न्यूज डेस्क : मागील महिन्यात राजस्थानमध्ये 15 लाखांची लाच मागणाऱ्या ED अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर आता पुन्हा तामिळनाडूतील दिंडीगुल येथे एका डॉक्टरकडून २० लाख रुपयांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने (DVAC) ईडी अधिकाऱ्याला अटक केली आहे. दिंडीगुल-मदुराई महामार्गावर आठ किलोमीटर पाठलाग केल्यानंतर ईडी अधिकाऱ्याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, दिंडीगुलमध्ये ताब्यात घेतल्यानंतर, डीव्हीएसी अधिकाऱ्यांच्या पथकाची मदुराई येथील उप-प्रादेशिक ईडी कार्यालयात ‘चौकशी’ करण्यात आली, राज्य पोलिस केंद्र सरकारच्या कार्यालयाबाहेर पहारा देत होते. DVAC च्या अधिकृत प्रकाशनात, अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव अंकित तिवारी असे आहे. जो केंद्र सरकारच्या मदुराई अंमलबजावणी विभाग कार्यालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. डीव्हीएसीच्या अधिकाऱ्यांनी तिवारी यांच्या घरावरही छापा टाकला.
अहवालानुसार, ईडी अधिकारी अंकित तिवारी यांना डीव्हीएसी कार्यालयातून नेण्यात आले आणि दिंडीगुल येथील न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले, तेथून त्यांना 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 2016 च्या बॅचचे अधिकारी असलेले तिवारी यांनी यापूर्वी गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये काम केले होते आणि सध्या ते मदुराई येथे तैनात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंकित तिवारीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते पाच वर्षांहून अधिक काळ ईडीमध्ये काम करत आहे. सेंट्रल एजन्सीमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी बिग 4 अकाउंटिंग फर्म्सपैकी एकामध्ये काम केले.
अटक कशी झाली?
डीव्हीएसी सूत्रांनी सांगितले की, ईडी अधिकारी महाराष्ट्र नोंदणी क्रमांक असलेल्या कारमध्ये २० लाख रुपये रोख घेऊन जात असताना त्याला थांबवण्यात आले. एसपी सरवणन यांच्या नेतृत्वाखाली डीव्हीएसी टीम चेट्टीनाईकनपट्टी, दिंडीगुलजवळ वाहन तपासणी मोहीम राबवत होती. त्यानंतर त्यांनी नागपूरच्या नागरिकाला घेऊन जाणारी कार अडवली. पोलिसांच्या पथकाला संशय येताच त्यांनी कारची तपासणी केली. कारची झडती घेतली असता 20 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. यानंतर कार आणि प्रवासी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
#WATCH | Tamil Nadu | ED officer Ankit Tiwari taken from the DVAC office to be produced before a judicial magistrate in Dindigul.
— ANI (@ANI) December 1, 2023
He was caught red-handed while accepting a bribe of Rs 20 lakhs from a doctor in Dindigul. He along with his team of ED officers had been… pic.twitter.com/F8JTReQnQq