Friday, January 3, 2025
Homeशिक्षणनव कृष्णा व्हॅली फुटबॉल क्लब चा मुंबई दबदबा...

नव कृष्णा व्हॅली फुटबॉल क्लब चा मुंबई दबदबा…

सांगली – ज्योती मोरे

मुंबई येथे स्टेट फुटबॉल लीग सुरू असून त्यामध्ये नव कृष्णा व्हॅली फुटबॉल क्लबचा 17 वर्षाखालील मुलांचा संघाची प्रथम सामना सॉकर फुटबॉल क्लब मुंबई यांच्याबरोबर पार पडला त्यामध्ये पाच शून्य अशी नव कृष्णा व्हॅली फुटबॉल क्लब ने मात करून द्वितीय सामन्यांमध्ये डिसोजा फुटबॉल क्लब मुंबई याला सात एकने नमून विजय प्राप्त केला.

यासाठी नव कृष्णा व्हॅली फुटबॉल क्लबचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जोशब सर (घाणा )व किसन भास्कर कलकत्ता येथील प्रशिक्षक या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ तयार झालेला असून दररोज सकाळी व सायंकाळी या वेळेमध्ये प्रोफेशनल फुटबॉल खेळ प्रकारचा सराव कृष्णा व्हॅली स्कूल एमआयडीसी कुपवाड येथे सुरू असतो या ठिकाणी अध्यावत असेल फुटबॉल ग्रास ग्राउंड तयार करण्यात आले आहे.

अजुनी तीन सामने होणार असून त्या स्पर्धेतून आयलीक स्पर्धेसाठी निवड होणार आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होता आहे. यासाठी सर्व ते मदत श्री प्रवीणजी लुंकड अध्यक्ष सुरज फौंडेशन एन जी कामत सचिव सुरज फाउंडेशन,संगीता पागणीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन रघुनाथ सातपुते एडमिन ऑफिसर,

अरिजीत गोस्वाल डायरेक्टर नव कृष्णा व्हॅली फुटबॉल क्लब विनायक जोशी इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक व आश्रम शेख फुटबॉल प्रशिक्षक यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: