मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाची निवडणुकीला अजून बराच उशीर असला तरी बरेच भावी आमदार कामाला लागले, मतदारसंघात आपापल्या परीने पैश्याची उधळून सुद्धा सुरू आहे. तर एका प्रसिद्धी पिसाट भावी आमदाराने तर कहरच केला सोशल मीडियावर पोस्ट टाकून टाकून लोकांना छळत असल्याचे अनेकांच्या तक्रारी आहेत. प्रोग्राम कोणाचाही असो हा बहाद्दर स्वतः तिथे जाऊन स्वतःची लायकी दाखवून येतो आणि त्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर टाकतो. एवढे फोटो पाहून लोकही बुचकळ्यात पडतात मनातल्या मनात त्याचा उद्धार करतात. अश्या भावी आमदाराला कोण निवडून देणार हा मोठा प्रश्न मतदारांच्या मनात सुरु आहे.
हा समाजात मोठा समाजसेवक असल्याचा आव आणणारा नकली समाज सेवक असून एक पक्षाचा पदाधिकारी आहे, पण पक्ष यावेळेस पक्ष तिकीट देणार की काय? असा प्रश्न त्याच्या मनात सुरू असल्याने तिकिट मिळेल त्या पक्षात जाण्याची तयारी या समाजसेवकाची आहे म्हणूनच हा कोणाच्याही कार्यक्रमात हजेरी लावतो. तर आयोजक हा दिसताच क्षणी तोंड फिरवतात तरी हा लागट सारखा कार्यक्रमाठिकाणी थांबतो आणि जबरदस्तीने सत्कार करवून घेतो असे काही आयोजक सांगतात.
मूर्तिजापूर विधानसभा मागासवर्गीयासाठी राखीव झाला आणि मतदारसंघाचा सत्यानाश झाला असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. चांगले काम करणारा व सर्वांना घेऊन चालणारा लोकनेता या मतदारसंघात एक सोडून आतापर्यंत मिळाला नाही. SC म्हणून जो समाज बदनामी झेलतो तोच समाज या मतदारसंघातुन आतापर्यंत वंचितच आहे. दुसऱ्या राज्यातून SC जातीचे प्रमाणपत्र घेऊन मतदारसंघात निवडणुक लढतात आणि आम्हीही बाबासाहेबाना मानतो असं खोटं सांगतात आणि मनात द्वेष ठेवतात अश्या उमेदवारांच्या पाठीशी लोक कसे उभे राहतात? असा सवाल काही राजकीय जाणकार करतात.