रामटेक – राजु कापसे
रामटेक विधानसभा क्षेत्रातील रामटेक, पारशिवनी व मौदा या तिन्ही तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या धान (भात) पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची त्वरित पाहणी करून शासनातर्फे ५० हजार रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई म्हणुन मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विद्युत बिल माफ करण्यात यावे, पेंच प्रकल्पातील पाणीपट्टी माफ करण्यात यावी तसेच पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी इत्यादी मागण्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब. ठाकारे.) पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशालजी बरबटे यांच्या नेतृत्वात मा. उपविभागीय अधिकारी सौ.वंदना सौरंगपते मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हास्तरीय, विधानसभा, तालुका व जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गण व गाव स्तरावरील संपूर्ण पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.