राज्यपालांनी दिली मंत्रिमंडळाला शपथ…
पातूर – निशांत गवई
राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अजूनही कायम आहे. अशातच राज्यातील मंत्रिमंडळचा विस्तार कधी होणार हे निश्चित नाही, मात्र अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील किड्स पॅराडाईज मध्ये चिमुकल्या मंत्रिमंडळाचा विस्तार मोठया उत्सहात पार पडला. शाळेच्या या मंत्रिमंडळाला चक्क राज्यपालांनी शपथ दिली.
पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना लोकशाही ची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यांनतर यामधून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनामधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि विविध खातेवाटप करण्यात आले. शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला.
यामध्ये राज्यपाल यांनी सर्व मंत्र्यांना खात्याची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी या सोहळ्याचे उदघाट्न पातुरचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी केले तर शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
मान्यवरांचे हस्ते संविधान व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी विदयार्थ्यांना शालेय जीवनात लोकशाही चे धडे गिरवणारा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मनोगत व्यक्त केले. संचालन श्रावणी गिऱ्हे हिने केले.
या सोहळ्यात राज्यपाल म्हणून यथार्थ चव्हाण यांनी मंत्रिमंडळाला शपथ दिली. तर मुख्यमंत्री म्हणून प्रतीक उत्तरकार उपमुख्यमंत्री प्रेरणा कांबळे गृहमंत्री हर्षल वानखडे अर्थमंत्री मनस्वी जाधव शिक्षण मंत्री गौरी इंगळे कृषी मंत्री प्रथमेश अमानकर सांस्कृतिक मंत्री तनुष पाकदुणे, क्रीडामंत्री क्रिष्टी चिकटे, आरोग्य मंत्री युवराज बंड,
पालकमंत्री म्हणून रुद्र परमाळे, सायली शेंडे, आराध्या गव्हाळे, समर्थ पाटील,सौम्यासिंह गहिलोत, संग्राम इंगळे, बोधी खंडारे,सर्वेश ठाकरे, आस्था काळपांडे,प्रणित डिवरे, कनिष्का खंडारे आदींनी शपथ घेतली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबळराव, अविनाश पाटील, हरीश सौंदळे, उमेर अहमद, रविकिरण अवचार, नीतू ढोणे, प्रियंका चव्हाण, योगिता देवकर, नयना हाडके, लक्ष्मी निमकाळे, तृप्ती पाचपोर, निकिता भालतिलक, प्रीती धोत्रे, प्रीती हिवराळे, शितल जुमळे, अश्विनी वानेरे, शानू धाडसे , रूपाली पोहरे, शुभम पोहरे यांनी परिश्रम घेतले.