चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथून ३ किमी अंतरावर असलेल्या अनखोडा येथील युवक रामकृष्ण नायगमकार (२६) हा आपल्या आईसह मामाच्या गावी जाण्याची तयारी करीत होता, मात्र अनखोडा ग्रामपंचायतीच्या शिपाईने ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे लावुन जाण्यास सांगितल्याने तो अनखोडा ग्रामपंचायतीच्या गावातील विद्युत खांबावर वर पथदिवे लावण्याचे कार्य करीत होता.
मात्र विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज २६ नोव्हेंबर रोजी घडली. यामुळे त्या युवकाची आईसह मामाच्या गावाला जाण्याची त्याची ईच्छा अधुरीच राहीली. घटनेची माहिती मिळतात आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले व त्यांची चमू घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्याचे मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे नेण्यात आले, रामकृष्ण हा युवक आपल्या आईला घेऊन मामाच्या गावाला जाणार होता.
मात्र ग्रामपंचायत कार्यालय येथील चपराशी हा रामकृष्ण याच्या घरी जाऊन ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्या करिता बोलवायला आला व आपल्या आईला पथदिवे लावून येतो असे सांगून निघून गेला. मात्र तो परत स्वताच्या अनखोडा या गावी आला नाही. मात्र रामकृष्ण याची मृत झालेली घटनेची माहिती अनखोडा गाव वासियांना कळताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकाच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सुद्धा अनखोडा गाव वासियांनी केली आहे.