सांगली – ज्योती मोरे.
बऱ्याच वर्षापासून राज्यातील राजकारणात विशिष्ट कुटुंबाची सत्ता आहे,ही सत्ता या कुटुंबाच्या बाहेर गेली पाहिजे.बहुजन समाजातील उमेदवार लोकप्रतिनिधी झाले पाहिजेत, यासाठी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सत्ता संपादन निर्धार सभेचा आयोजन सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी आणि युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे यांनी दिली.