मुंबई – धीरज घोलप
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकताच ऑनलाईन माध्यमातून जिल्हास्तरीय (मुंबई DYD – मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्हा एकत्रित) कला उत्सव संपन्न झाला.
या कला उत्सवात ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम) येथील *संदेश विद्यालय अँड ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स व सनराईज इंग्लिश स्कूल या दोन शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाची अनुक्रमे ६ व ४, अशी एकूण १० पारितोषिके पटकावून घवघवीत यश संपादित केले.
या विद्यार्थ्यांची दि. २१ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महात्मा फुले सभागृह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ, पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड झाली आहे.
संदेश विद्यालयाने जिल्हास्तरीय कला उत्सवात सलग ९व्या वर्षी सर्वाधिक पारितोषिक पटकावून बृहन्मुंबई उत्तर विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सुयशप्राप्त विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षण विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री.गजेंद्र बनसोडे व शाळेतील संगीत शिक्षक मनोहर म्हात्रे व भूषण मोकल, कला शिक्षक तुषार चौधरी व प्रवीण पाटील, नृत्य दिग्दर्शक विश्वनाथ पवार, प्रदीप खामकर, छायाचित्रण करणारे सुयश म्हात्रे यांचे संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे,
संस्थेच्या विश्वस्त मेघा म्हात्रे, संस्थेचे विश्वस्त व संदेश विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे आणि सनराईज इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका फातिमा टोले यांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.