लोकल डब्ब्यात पाकीटमार वाढण्याची भीती…
ठाणे – प्रफुल्ल शेवाळे
लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिक्रुत परवाना देण्यास रेल्वे प्रवासी संघटनांचा विरोध. मुंबई लोकल मधील रोजच्या चाकरमान्यांची प्रवासी संख्या व लोकलच्या फेऱ्यां व्यस्त प्रमाणात असल्याने कोणत्याही वेळेला लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. ह्यामुळे उपनगरीय रेल्वे मध्ये चढता/उतरताना व प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते.
ह्याच गर्दीत लोकल मध्ये येणारे फेरीवाले विकायला आणलेल्या वस्तूंसह डब्यात सर्वत्र फीरत असल्याने प्रवाशांना ह्या फेरीवाल्यांचा त्रास होतो. सध्या ह्या फेरीवाल्यांचा व्यवसाय अनधिक्रुत असल्याने किमान ह्यांच्या विरोधात प्रवाशांना तक्रार तरी करता येते.
रेल्वे प्रशासनाकडून फेरीवाल्यांचे अधिकृत व्यवसाय करिता परवाने देण्याच्या बातम्यांची चर्चा सध्या दिसून येत आहे.यावर रेल्वे प्रशासनाने फेरीवाल्याना लोकलमध्ये वस्तू विकायला अधिकृतपणे परवाना दिल्यास लोकल मध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये संघर्ष वाढेल, प्रवाशांना त्रास झाल्यास, परवानाधारक असल्याने प्रवासी ह्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार करू शकणार नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखीन वाढ होईल यात शंका नाही.
रेल्वे प्रशासनाकडून लोकल फेऱ्या वाढविण्याची आश्वासने दिली जातात पण अद्याप पर्यत लोकल फेऱ्या वाढलेल्या नाहीत. लोकलचे वेळापत्रक आँक्टोबर मध्ये बदलणार होते, पण नोव्हेंबर महीना संपत आला तरी नवीन वेळापत्रकाचा पत्ता नाही….
यावर उपाययोजना करण्याऐवजी सध्याच्या अनधिकृत फेरीवाल्यांचा लोकल मधील व्यवसाय अधिक्रुत करण्यासारखा चुकीचा निर्णय घेऊन प्रवाशांच्या त्रासात वाढ होवू नये, ह्यासाठी ह्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन विविध प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाला केले आहे.
यासंदर्भात रेल्वे प्रवासी महासंघाकडून तत्सम पत्र व्यवहार आणि विरोधाची भूमिका दिसून येणार आहे…रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे..
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णया मुळे लोकल मधील पाकीट मारांचे प्रमाण वाढेल… अगोदरच अनेक लोकल मध्ये गर्दुल्ले हे प्रवास करत असतात… मागील काही दिवसांचा इतिहास पाहता मेल एक्सप्रेस आणि लोकल मधील फेरीवाले हेच पाकीटमार असल्याचे उदाहरणं समोर आली आहेत…
फेरीवाल्यांना व्यवसाय करिता रेल्वे स्थानक शेजारील जागा देण्यात भाड्याने यावी आणि लोकल मध्ये फेरीवाला नकोच अशी कडक भूमिका कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी व्यक्त केली आहे..
रेल्वे प्रशासनाने लोकल फेरीवाला यांना परवाना देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून लोकल प्रवाशांना काहीश्या सुखकर प्रवासाकरिता सहाय्य करावे असे कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन चे अध्यक्ष शैलेश राऊत यांनी म्हटलं आहे..