महावितरण विभागाचे दुर्लक्ष….
लाखपुरी सह इतर गावे अंधारात….
वृत्तसेवा – अतुल नवघरे
लाखपुरी : १८ , मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी सर्कल मधील दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणार-या लाखपुरी सह इतर गावानमध्ये नेहमी लाईट चालु बंद राहत असल्यामुळे नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागत आहे . अंधारात राहाण्याची वेळ आली आहे.विद्युत उपकरण शॉट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री बेरात्री लाईट बंद राहत आहे.
त्यामुळे घरात असलेला महागड्या वस्तू फ्रिज , टिव्ही , कॉम्प्युटर , पंखा सह इ . वस्तूची नुकसान होवु शकते .सदर समस्ये कडे महावितरण विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असुन संबधित दुर्गवाडा फिटर अंतर्गत जे काही गावे येत आहे.
त्या गावातील लाईन नेहमी बंद राहत आहे. याकडे कोणी याकडे लक्ष पण देत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे . सदर दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणा-या सर्व गावातील लाईनच्या समस्यानचे प्रश्न सोडवाव्यात हि मागणी नागरिकांन कडुन होत आहे.
दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणा-या लाखपुरी सह इतर गावानमध्ये लाईन सतत बंद राहत आहे. तरि संबधित माहावितरण विभागाने याकडे तातकाळ लक्ष देवुन प्रश्न निकाली काढावा..
सौ. मिनल नवघरे ( माजी पं.स. सदस्या लाखपुरी )
लाखपुरी सह इतर गावामध्ये लाईन बंद राहत असल्यामुळे नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागत आहे.. संबधित विभागाने समस्या सोडवावी.
ऋषिकेश डिके ( माजी. ता महासचिव युवा आघाडी वंचित )
सतत लाईन जात असल्यामुळे घरातील विद्युत उपकरण जळण्याची भीती आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे.
ग्रामस्थ लाखपुरी ( गजानन गवई )