वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे ग्रामरोजगार सेवक संवाद मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित ग्राम रोजगार सेवक यांना तुम्ही गावातील पुढारी नेमण्याचे कामे करतात परंतु तेच पुढारी नेते मंडळी तुम्हाला कामावरून कमी करतात त्यामुळे गावामधील तत्ता पलटी करताना तरी तुमच्यावर अशा प्रकारची वेळ येते त्यामुळे वेळीच सावध होऊन आपल्या मताचे निवडणुकी त उमेदवार निवडून द्या तसेच तुमच्याकडे अजूनही संधी आहे लोकसभा आणि विधानसभा होण्यापूर्वी सरकार बदलण्याची ताकद तुमच्याकडे आहे.
ग्रामरोजगार सेवकांच्या व्यथा बऱ्याच आहे ग्राम रोजगार सेवकांना काढण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतला नाही तो जिल्हा परिषद यांना आहे तसेच ग्रामरोजगार सेवक हे यांचे मानधन महिन्याला मिळायला हवे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार त्यामध्ये काय मार्ग निघतो हे बघता येणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये गोडाऊन निर्माण केल्यास गावातील मजुरांना व ग्राम रोजगार सेवकांना त्याचा फायदा होणार असेही बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित ग्राम रोजगार सेवकांना संबोधित केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार योगेश शिरसाट यांनी सुरू केलेल्या युवा परिवर्तन या साप्ताहिकाचे विमोचन केले.
याप्रसंगी श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार योगेश शिरसाट पाठीवर कौतुकाची थाप मारत पुढील पत्रकारिता आशीर्वाद दिले. तेव्हा व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे,
प्रबुद्ध भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रतुल विरघट, ग्राम रोजगार सेवक संघटनेचे राज्य संघटक नरेंद्र सदांशिव, जिल्हाध्यक्ष देवगन इंगळे, जिल्हा महासचिव किशोर तेलगोटे आदी अकोला जिल्हाभरातील ग्रामरोजगार सेवक जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे संवाद मिळाव्यास उपस्थित होते. – बाळासाहेब आंबेडकर
योगेश शिरसाट, अकोला