खामगाव – हेमंत जाधव
भारतमातेचे सुपुत्र आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या कार्याची मातंग समाजाच्या युवकांनी जाणीव ठेवावी आणि समाजामध्ये जागृती निर्माण करून क्रांतिपिता लहूजी साळवेंच्या महान कार्यामधून प्रेरणा घ्यावी व समाजामध्ये परिवर्तन निर्माण करावे कारण हे काम समाजातील युवक वर्ग योग्य प्रकारे करू शकतो असे प्रेरणादायी विचार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे बुलढाणा जिल्हा उत्तर युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष कृष्णा नाटेकर यांनी काढले ते आद्य क्रांतिगुरू लहूजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम बुलढाणा जिल्हा उत्तर युवा आघाडी तर्फे दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजी खामगांव शहरात अभिवादन कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शा.ना. मानकर होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते लहूजी वस्ताद साळवेंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली कार्यक्रमाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी जेष्ठनेते संताराम तायडे व जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनोने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लहूजी साळवे यांच्या कार्यावर भाषणे दिलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे खामगाव शहर अध्यक्ष सुधाकर वानखेडे यांनी तर आभारप्रदर्शन युवा आघाडी शहराध्यक्ष नामदेव बाभूळकर यांनी केले याप्रसंगी युवा उद्योजक दिपक गवई सामजिक कर्यकरते संतोष कांबळे राजेश लालमन शिवाजी बोदडे, राहुल नाटेकर वृशभ जाधव विशाल नाटेकर, आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते