रामटेक – राजु कापसे
रामटेक येथील विरपुत्र अक्षय अशोक भिलकर हे ३ नोव्हेंबर २०१८ पासुन लष्करात तैनात होते. त्यांना कर्नाटक येथिल बेलगाम येथे प्रशिक्षण काळात दि.१२ नोव्हेंबर ला अपघाती विरमरण आले. त्यांचे पार्थिव रामटेक बसस्थानंक चौक येथे आले असता, उपस्थित हजारो नगरवासियांना आपले अश्रू आवरता आलेले नाही.
यावेळी “भारत माता की,जय ” चा जय घोषाने संपुर्ण परिसर दणाणून गेलेला होता. लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव आणण्यात आले. शिवनगर, मंगळवारी वार्ड नेहरु चौक मार्गक्रमण करीत त्यांच्या राजाजी वार्ड येथिल निवासस्थानी अंतिम दर्शनाकरिता आणण्यात आले.
तेथे अंतिम विधी आटोपल्यावर तिरंगा ध्वजाने पार्थिवाला गुंडाळुन लष्करी वाहणाने गांधी चौक, शनिवारी वार्ड येथे पोहचली. बसस्थानंक ते अंबाळा या तिन कि.मी.मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुला आपल्या लाडक्या विर रामटेक पुत्राच्या अंतिम दर्शनाकरिता शोकाकुल हजारो बंधू भगिनींची रिंग लागलेली होती.
वंदे मातरम,भारत माता की,जय “चा घोषणाने तथा देशभक्ती च्या संगितानी संपुर्ण रामनगरी भावनिक झालेली आहे.संपुर्ण मार्ग रांगोळीने रेखाटलेली होती. पुष्पवृष्टी चा वर्षाव करुन नागरिकांद्वारे श्रध्दाजंली अर्पण करुण अखेरचा सलाम केला. अंबाळा मोक्षधाम येथे विरपुत्रचा पार्थिवावर शासकिय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.
याप्रसंगी पोलीस ईतमामात ११ बंदुकातून फैर्या झाडुन अंतिम सलामी देण्यात आली. यावेळी कार्यालय , न.प. चे प्रशासकिय अधिकारी राजेश सव्वालाखे, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री राजेन्द्र मुळक, माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी, सुधिर पारवे, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे ,
विजय हटवार, उ.बा.ठा.चे विशाल बरबटे ,धर्मेश भागलकर, गजु बिसने, संजय बिसमोगरे आलोक मानकर, राहुल ठाकुर, पत्रकार मंडळी, आदींनी पार्थिवावर षुष्पचक्र अर्पण करुन भावपुर्ण श्रध्दाजंली वाहिली.