IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज बुधवारी (१५ नोव्हेंबर) विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत भारताने नऊ सामने जिंकले आहेत आणि विजयाची घोडदौड सुरू ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने पाच सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. मुंबईत सामन्यापूर्वी मोठा वाद सुरू झाला. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत परदेशी मीडियाने गदारोळ सुरू केला आहे. त्यांनी बीसीसीआयवर पक्षपाताचा आरोप केला आहे.
वास्तविक उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियमच्या सात क्रमांकाच्या खेळपट्टीवर होणार होता, मात्र आता सहा क्रमांकाच्या खेळपट्टीवर होणार आहे. या खेळपट्टीवर वर्ल्ड कपमध्ये दोन सामने खेळले गेले आहेत. जुनी खेळपट्टी असल्यामुळे ती फिरकी गोलंदाजांना अधिक मदत करू शकते. अशा परिस्थितीत बीसीसीआयवर सामन्यापूर्वी जाणीवपूर्वक खेळपट्टी बदलल्याचा आरोप होत आहे.
बीसीसीआयकडून मागितले उत्तर?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने बीसीसीआयकडून खेळपट्टीबाबत उत्तर मागितले आहे. बीसीसीआयने याप्रकरणी आयसीसीला आपले म्हणणे मांडले आहे. बोर्डाने हे आरोप फेटाळून लावले आणि खेळपट्टी बनवण्याच्या वेळी आयसीसीचे सल्लागार उपस्थित असल्याचे सांगितले. सर्व काम फक्त त्याच्या सूचनेनुसार केले जाते. कोणत्या मैदानावर कोणती खेळपट्टी वापरली जाईल हे तो सांगतो.
आयसीसी नियम
आयसीसीने असा कोणताही नियम बनवलेला नाही, ज्यानुसार नॉकआऊट सामने नवीन खेळपट्ट्यांवर खेळवले जावेत. आयसीसीच्या खेळपट्टी आणि आऊटफिल्ड निरीक्षण प्रक्रियेत एकच अट आहे की ज्या ठिकाणी सामन्याचे आयोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे ती त्या सामन्यासाठी सर्वोत्तम संभाव्य खेळपट्टी प्रदान करेल.
ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे विधान
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने खेळपट्टीच्या वादावर वक्तव्य करून सगळ्यांना शांत केले आहे. तो म्हणाला, “साहजिकच आयसीसीकडे एक स्वतंत्र पिच क्युरेटर आहे जो त्याचे व्यवस्थापन करतो. मला खात्री आहे की ते दोन्ही संघांसाठी योग्य असल्याचे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत मला या स्पर्धेत कोणतीही अडचण आलेली नाही.
There's a growing furore over the pitches for the #CWC2023 semi-final and final.
— Fox Cricket (@FoxCricket) November 15, 2023
STORY: https://t.co/tFxW9iCIiX pic.twitter.com/GWeMCrqBzk