Friday, October 18, 2024
Homeराज्यश्री तुषार सुर्यवंशी महाराज यांचे विनोदी प्रबोधनत्मक कार्यक्रमाचे आयोजन...

श्री तुषार सुर्यवंशी महाराज यांचे विनोदी प्रबोधनत्मक कार्यक्रमाचे आयोजन…

रामटेक – राजु कापसे

दिवाळीच्या पावन पर्वावर न्यु स्वास्तिक मंडई उत्सव मंडळ, पटगोवारी यांच्या तर्फ़े दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजी सप्तखंजेरी वादक, समाज प्रबोधनकार श्री.सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजेरीवादक, राष्ट्रीय प्रबोधन श्री.तुषार सूर्यवंशी महाराज यांचा विनोदी प्रबोधनत्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाला रामटेक विधान क्षेत्राचे आमदार मा. आशिषजी जयस्वाल साहेब तसेच रामथाम चे संस्थापक पर्यटक मित्र मा. चंद्रपालजी चौकसे उपस्थित राहुन सप्तखंजेरीवादक श्री.तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या किर्तन कार्यक्रमाचा आनंद घेतला व उपस्थित सर्वांना कार्यक्रमाच्या व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी श्री.अनुपजी कंभाले, श्री.गणेशजी कुळे, श्री.राजेश भोयर, श्री.पुष्पराम भोयर, श्री.मंगेश जोगे, श्री.हिमांशु पालकर, श्री.अशोक मंगल, श्री.विशाल भोयर, श्री.नरेश कोठेकर, श्री.संजय भोयर, श्री.विकास एलेकर, श्री.गजानन सहारे, श्री.अनिल कुळे व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: