सहारा श्री सुब्रत रॉय यांचे वयाच्या 75 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते गंभीर आजाराने त्रस्त होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांचे पार्थिव लखनौला आणण्यात येणार आहे. लखनौमध्येच त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार ते एका गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
सहारा इंडिया परिवाराने एक प्रेस नोट जारी करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
10 जून 1948 रोजी जन्म
सुब्रत रॉय सहारा यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते. बिहारच्या अररिया जिल्ह्यात जन्मलेल्या सुब्रत रॉय यांनी आपले प्राथमिक शिक्षण कोलकाता येथील होली चाइल्ड स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. सहाराश्रीने 1978 मध्ये गोरखपूरमधून व्यवसाय सुरू केला.
Sahara Group Managing Worker and Chairman Subrata Roy passes away due to cardiorespiratory arrest: Sahara Group pic.twitter.com/ugUdBrxiSp
— ANI (@ANI) November 14, 2023