सांगली – ज्योती मोरे
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी हे स्वतःच्या आरोग्यापेक्षाही सांगलीच्या आरोग्याची काळजी घेत असल्यानेच महापालिका क्षेत्र हे स्वच्छ आणि सुंदर झाले असल्याचे मनोगत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी व्यक्त केलंय.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील स्वच्छता,पाणीपुरवठा त्याचबरोबर लाईट व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर माजी नगरसेवक विष्णू माने यांनी कौतुकाची थाप देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात दिवाळी भेट या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं,त्यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव उपस्थितांसमोर बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुधीर भालेराव,एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अविनाश पाटील उपस्थित होते.माजीनगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने यांनी 13 वर्षे झाली हा उपक्रम राबवत आहेत.
आई लक्ष्मीबाई अण्णासाहेब माने,स्वच्छता निरिक्षक गणेश धोत्रे,मुकादम प्रकाश चव्हाण,अजित पाटील,संजय पाटील,धोंडीराम अण्णा माने,कांबळे काका, जितू हेगडे,आवले काका,फारणे साहेब, मनोज लांडगे,तील्यालकर साहेब, नाना गायकवाड,गणेश माने,राजू चव्हाण,दादा वायदंडे,भारत माने,जाधव काका,व पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.