Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | मोटारपंप चोरी करणार्‍या टोळीला अटक...

रामटेक | मोटारपंप चोरी करणार्‍या टोळीला अटक…

रामटेक – राजू कापसे

शेत शिवारातुन मोटारपंप चोरी करुन त्पांचा गोरखधंदा करणार्‍या तीन आरोपीना अटक करुन रामटेक पोलिसांनी कारवाई केली. रामटेक पोलीस ठाण्यांअर्गत येणार्‍या ग्राम रा. चिचाळा श्री जनजिवन हनुमानप्रसाद दमाहे यांच्या संग्रामपुर शेतातील नहरावर लावलेली मोटारपंप चोरट्यांनी बुधवारी रात्री चोरुन नेल्याची घटना शेतशिवारात घडलेली आहे.

या संदर्भात रामटेक पोलीस स्टेशन येथे अप कमांक्र ८४३/२३ , भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरील प्रकरणाचा तपास करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे एकुन ३ आरोपी नामे १) राजु रोमन मुटकुरे रा. खोब्रावटी रामटेक २) कन्हैया चैतराम डहारे रा. खोब्रावटी रामटेक ३) छोटु देवराम रामटेके रा. मनसर रामटेक यांना गुन्हात अटक करण्यात आली असुन आरोपी कडुन गुन्हात चोरी केलेली मोटारपंप रु. १२५००/- माल वसुल करण्यात आला.

सदर कार्यवाही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आशित कांबळे, सा. पोलीस निरीक्षक ह्रदयनारायन यादव यांचे मार्गदर्शनात DB पथक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पोलीस हवालदार अमोल इंगोले, पोलीस शिपाई मंगेश सोनटक्के, शरद गिते, धिरज खंते यांनी केली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: