Tesla : जगातील आघाडीच्या इलेक्ट्रिक कार ब्रँड टेस्लाला (Tesla) भारतात प्रवेश मिळवून देण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. लवकरच सर्व अडथळे दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एलोन मस्क (Elon Musk) यांची कंपनी टेस्ला देशात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.
जानेवारी 2024 पर्यंत सर्व आवश्यक मंजुरी देण्याचे काम सरकारी विभाग करत आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी टेस्लाच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावासह देशातील इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादनाच्या पुढील टप्प्याचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बैठकीचा अजेंडा सामान्य धोरणात्मक बाबींवर केंद्रित असला तरी, जानेवारी 2024 पर्यंत देशात टेस्लाच्या प्रस्तावित गुंतवणुकीला जलद मंजुरी देण्याबाबत चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि टेस्ला प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यात गेल्या जूनमध्ये त्यांच्या राज्य भेटीदरम्यान अमेरिकेत भेट झाली होती. या बैठकीनंतर, वाणिज्य आणि उद्योग, अवजड उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय इलेक्ट्रिक कार निर्मात्याच्या योजनांबद्दल चर्चा करत आहेत.
२६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. कार कंपनी टेस्लाच्या (Tesla) उच्च अधिकाऱ्यांनी भारतात कार आणि बॅटरी उत्पादन सुविधा सेटअप करण्याच्या सरकारच्या योजनेवर चर्चा केली आहे. टेस्लाने आपली पुरवठा साखळी इकोसिस्टम भारतात आणण्यात स्वारस्य दाखवले आहे.
टेस्लाने (Tesla) यापूर्वी पूर्णपणे असेंबल केलेल्या इलेक्ट्रिक कारवर 40 टक्के आयात शुल्क मागितले होते, तर सध्याचा दर $40,000 पेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 60 टक्के आणि त्यावरील किमतीच्या वाहनांवर 100 टक्के आहे.