दानापूर – गोपाल विरघट
एक पणती उजेडासाठी या ग्रंथाचे विमोचन मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री मंत्रालय महाराष्ट्र यांचे हस्ते नुकतेच मुंबई येथे संपन्न झाले. एक पणती उजेडासाठी हा ग्रंथ डाॅ प्रतिमा इंगोले यांचे मातामह (आईचे वडील)कै.श्यामराव कुकाजी ढाकरे हे स्वातंत्र्य सैनिक तसेच आदर्शशिक्षक होते.
त्यांचेवरील अनेक मान्यवरांचे लेख असलेला हा ग्रंथ सर्वांनी संग्रही ठेवावा असा आहे.ह्या ग्रंथाला स्व.ग.प्र.प्रधान सरांची प्रस्तावना आहे.तसेच स्वातंत्र्य सैनिक समितीचे अध्यक्ष अच्युतराव देशपांडे व त्यांच्या चळवळीतील बलीदानाला परिचीत असणारे एकनाथराव तिडके यांचा तसेच जिथे हा स्वातंत्र्य लढा झाला तेथील तुळशीदास खिरोडकर यांचा व डाॅ प्रतिमा इंगोले यांचा तिरंग्याच्या रंगासाठी हा लेख आहे.
स्व.बापूसाहेब लोकप्रिय नेते होते.माजी मंत्री सरनाईक ,वामनराव कोपरे,विरघट याचे लेख आहेत.बापूसाहेब यांना कवी म्हणून जाणणार्या साहित्यिकांपैकी राम शेवाळकर ,विठ्ठल वाघ, अरूण साधू,शंकर वैद्य,केशव बोबडे,केशव मिश्रा,पुरषोत्तम बोरकर,डाॅ. वि.भि.कोलते, डाॅ सुशीला पाटील,यांचे लेख आहेत.
तर काही शिक्षक व काही विद्यार्थी काही गावकरी यांचे लेख आहेत. एका राष्ट्रशिक्षकाची ही कहाणी प्रेरणादायी व तितकीच मार्गदर्शक असून ती दीपावली च्या तोंडावर सर्वांना प्रकाश प्रदान करणारी असे मा.मंत्री महोदय म्हणाले.यावेळी कमलाकर जगताप दूरदर्शन प्रतिनिधी उपस्थित होते.