रामटेक – राजु कापसे
चाचेर,ता.मौदा येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी,मोतिबिंदु तपासणी व मोफत चष्मे वाटप चाचेर येथील परमात्मा एक भवन येथे आयोजित करण्यात आले होते.
महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ पतासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण- १३२ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-३१, औषधी द्वारे उपचार होणारे लाभार्थीं-१०,व चष्मे करिता-९१ लाभार्थींनी लाभ घेतला.
आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.
यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.