रामटेक – राजु कापसे
रामटेक – कृषी केंद्र संचालकाची मानहानी करणारा कायदा राज्य साशन करून पाहत असून त्याचा विरोध संचालकांनी केला. कायद्यातील काही कलमे रद्द करण्यासाठी रामटेकात आंदोलन करण्यात आले तसेच तहसीलदार रामटेक रामटेक विधानसभा आमदार आशिष जयशवाल, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान २ ते ४ नोव्हेंबर पर्यंत तालूकातील दुकानें बंद ठेवण्याचा निर्णय रामटेक तालुका ऍग्रो डिलर्स अशोशीयेशन तर्फे करण्यात आला आहे… बोगस बियाणे कीटकनाशके खत विक्री प्रकरणी निर्माते यांना दोषी न धरता विक्री प्रकरणी कृषी केंद्र चालकास दोषी ठरवून त्यांच्या विरुद्ध मपडा कायद्याने कारवाई करण्यासाठी कायदा तयार करण्याचे राज्य सरकारने प्रयत्न सुरु आहेत…
हा कायदा कृषी केंद्र चालकावर अन्याय करणारा आहे… या कायद्याला विरोध करण्यासाठी आज पासून कृषी केंद्र कडकडीत बंद करून तालुक्यातील सर्वच कृषी केंद्र बंद केल्याची माहिती तालुका सचिव रवी नवघरे यांनी दिली..
राज्य शासनाने प्रस्तावित असलेल्या कायद्यातील ४०, ४१,४२,४३ व ४४ या कलमाची संघटनेने विरोध केला असून ही कलमे रद्द करण्याची मागणी तालुका अध्यक्ष हंसराज शोभानंद.सचिव रविकुमार नवघरे कोषध्यश मधुकर गिऱ्हे संदीप चापले कमलाकर हिंगे निखिल नाटकर योगेश झाडे, रवी नवघरे यांनी केली आहे..