Saturday, September 21, 2024
Homeराज्यजनप्रभा महाविद्यालयात एकात्मता दिवस साजरासर्व भेदभाव विसरून मानवतेसाठी जगा - समतादूत राजेश...

जनप्रभा महाविद्यालयात एकात्मता दिवस साजरासर्व भेदभाव विसरून मानवतेसाठी जगा – समतादूत राजेश राठोड…

रामटेक – राजु कापसे

आज दिनांक ३१ आक्टोबर २०२३ रोजी जनप्रभा महाविद्यालय, रामटेक व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक यांच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त व आयर्न लेडी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त बोलत असतांना समतादूत राजेश राठोड यांनी देशाच्या एकात्मतेसाठी ५६५ संस्थान एकसंघ करून अखंड भारत निर्मितीचे प्रतिक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्व भेदभाव विसरून मानवतेसाठी जगायला पाहिजे असे मत व्यक्त केले.

सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल व प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सत्यजीत खताळ होते.

त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल व प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.संचलन उपप्राचार्य लहू झूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका कोमल गराडे यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे,विभाग प्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण,निबंधक इंदिरा अस्वार,जिल्हा प्रकल्प अधिकारी ह्रदय गोडबोले तसेच संस्थाध्यक्ष डॉ.रामचंद्र जोशी व डॉ ललिता चंद्रात्रे यांनी मार्गदर्शन केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: