रामटेक – राजु कापसे
श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर) तर्फे मेयो हॉस्पिटल नागपुर येथील तज्ञ डॉक्टराद्वारे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन रामधाम तीर्थ (मनसर) येथे करण्यात आलेले होते या शिबिराचे उदघाटन मा.श्री. चंद्रपालजी चौकसे (पर्यटक मित्र, संस्थापक रामधाम तीर्थ (मनसर) व सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका, रामधाम तीर्थ मनसर) यांचे शुभहस्ते करण्यात आले.
शिबिरात आलेल्या महिलांसाठी श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर) तर्फे अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. शिबिरात १५० महीलांनी तपासणीच्या लाभ घेतला. व तज्ञ डाॅक्टर यांनी ब्रेस्ट कॅन्सर वर मार्गदर्शण केले.
यावेळी प्रामुख्याने डॉ. अतिश बंसोड, डॉ. रोहन उमालकर, डॉ. प्रमोद, डॉ. नितीन, डॉ. मोक्तिक, डॉ. गणेश, डॉ. संचिता, डॉ. श्रुती, डॉ. रितिका, श्री. गोपालजी कडु, श्री. शोभाताई राऊत (माजी नगराध्यक्ष रामटेक), सौ. विमलताई नागपुरे, लक्ष्मण मेंघरे, राहुल पिपरोदे, रामानंद अडामे, कार्तिक उराडे, यशोधराताई लांजेवार, राधाताई यादव,
गौतमाताई राऊत, जयश्रीताई मलघाटे, सरिता जुवार, सोनल मुदलियार, अर्चनाताई अमृतकर, आचल लांजेवार, सरिता भरणे, वच्चला शेंडे, वैशाली मेश्राम, लिलाबाई राऊत, सोनाली मावळे, संगीता मेश्राम, ज्योती मेश्राम, रीना वाघाडे, सुनीता कुसवाह उपस्थित होते.