रामटेक – राजु कापसे
संपूर्ण विदर्भात विजयादशमीच्या दिवशी रावणाला जाळण्यात येते परंतु रामटेक येथेच पारंपारिक पद्धतीनेनुसार रावणाचा वध केला जातो. दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोज,मंगळवारला पारंपरिक प्रथेनुसार रामटेक गड मंदिरातील निशाणीची विधीवत पूजा करून गडावरून निघालेली निशाणीची गांधी चौक,रामटेक येथे पुष्प वर्षाव करून रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी. मल्लिकार्जूनजी रेड्डी यांनी स्वागत केले.
ही रावणवधाची निशाणी रामटेक जवळील मानापुर गावातील डीगीच्या मैदानात पोहोचल्या नंतर सूर्यास्ताअगोदर रावणवध करण्यात आला. प्रसिद्ध रावण वधाला उपस्थित राहून रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी. मल्लिकार्जूनजी रेड्डी तसेच पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी रामटेक व परिसरातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे,माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख,मानापूर ग्रा.पं. चे सरपंच संदीप सावरकर,एस. डी. ओ. वंदना सवरंगपते, पोलीस उपविभागीय अधिकारी आशित कांबळे,तहसीलदार डॉ.हंसा मोहणे ,न.प.मुख्याधिकारी पल्लवी राऊत , पोलिस निरीक्षक हृदय नारायण यादव ,रामटेक शहरातील व गडमंदिर पुजारी पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मंडळी आवर्जुन उपस्थित होते.