Sunday, December 22, 2024
Homeखेळनव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम चा १७ वर्षाखाली मुली नेटबॉलचा संघ...

नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम चा १७ वर्षाखाली मुली नेटबॉलचा संघ राज्य स्पर्धेसाठी निवड…

सांगली – ज्योती मोरे.

क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या विद्यमाने विभागीय स्तरीय शालेय 14, 17, 19 वयोगटातील मुला मुलींच्या नेटबॉल स्पर्धेचे आयोजन शिवाजी स्टेडियम सांगली येथे करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमच्या 17 वर्षाखालील मुलींचा संघ कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर ग्रामीण व सातारा संघाला अंतिम सामन्यात नमवून प्रथम क्रमांक प्राप्त करून धुळे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नव कृष्णा व्हॅली स्कूल ने प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच मुलांच्या 17 वर्षे खालील गटामध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम ने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे यांना प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक श्री सुशांत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा प्रवीण जी लुंकड, एन जी कामत सचिव,प्राचार्य संगीता पागनीस, उपप्राचार्य प्रशांत चव्हाण, एडमिन ऑफिसर रघुनाथ सातपुते, विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: