रामटेक – राजु कापसे
धान उत्पादक शेतकऱ्यांकडून शासकीय धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करन्यापूर्वी “KYC UPDATE” करण्यासाठी,रामटेक तालुक्यातील काही बँकांतर्फे खातेदारांकडून १५० + २२ रु. जीएसटी(GST) = १७७/ रुपये शुल्क आकारले जात असल्याने, शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
हे शुल्क आकारल्यामुळे बँकेचा खात्यात करोडो रुपये जमा होतात. शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी रामटेकच्या उपविभागीय अधिकारी मा. श्रीमती वंदना सवरंगपते मॅडम यांना निवेदन देऊन चर्चा केली.
उपविभागीय अधिकारी यांनीसुद्धा कार्यतत्परता दाखवत बँकेला त्वरीत सूचना केल्या. व शेतकऱ्यांवरील आर्थिक अन्याय त्वरीत दूर होईल असा विश्वास दिला. याप्रसंगी आदिवासी क्षेत्राचा बुलंद आवाज व तडफदार जिल्हा परिषद सदस्य मा.हरिशजी उईके, कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक चे सभापती मा. सचिनजी किरपान,
मा.त्रिलोकजी मेहर, मा.अनीलजी गुप्ता, मा.वसीमभाई कुरेशी, मा. अमितभाऊ अंबादे, मा.राकेशजी साखरे, मा.अजुभाई पठाण,मा.अरविंदजी कडबे, मा.आश्विनजी ठाकूर, मा.रामूजी झाडे, मा.विजयजी मदनकर, मा.भीमरावजी आंबिलडुके, मा.माधवजी सोरले, इत्यादी सहकारी उपस्थित होते.