मूर्तिजापूरकरांना आनंदाची बातमी म्हणजे रेल्वे स्थानकाचा होणारा कायापालट, १२८ कोटी २० लाख रुपये खर्च करून पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. तर अनेकांना स्थानकाचे ग्राफिक्स फोटो पाहूनच आनंद झाला, दुःखाची बाब म्हणजे १२८;२० कोटींच्या प्रकल्पाचा सोशल मीडियावर पाहिजे तेवढा उदोउदो झाला नाही. अनेकांच्या मते यातील एक कवडीही लोकप्रतिनिधींना मिळणार नसल्याने त्यांचा हिरेमोड झाला असेल, अशी चर्चा जनसामान्यांच्या तोंडातून ऐकायला मिळते.
दुसरीकडे या जुन्या रेल्वे स्थानकाच परिसरातील लोकांशी एक वेगळं नात आहे, कारण या रेल्वे स्टेशनने आजूबाजूच्या नागरिकांना जगवल. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या दुष्काळात नेहमी मदत केली मात्र कालांतराने पाण्याची कमतरता भासू लागल्याने त्यावर रेल्वे प्रशासनाकडून आवर घालण्यात आली. ज्यावेळेस नगरपालिका कामात आली नाही तेथे रेल्वे मदतीला धावली. स्टेशन विभागातील काही भाग, आणि एकता नगर मधील गोरगरीब माय माऊल्या पाण्यासाठी भटकायच्या तेव्हा रेल्वे स्टेशनच शेवटची आस असायची आताही आहे, मात्र आता सपाट्याने काम सुरु असल्याने अनेकांना पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. १५ वर्षा अगोदर फलटावरील नळ नेहमी सुरू असायचे, नंतर पाणी भरण्यासाठी गर्दी वाढल्याने सेवा बंद केल्या गेली. आता रेल्वे प्रशासनाने गाडी येण्याच्या पाच मिनिटे अगोदर नळ सोडतात आणि रेल्वेस्थानकावर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड होते. मात्र यापुढे होणार की नाही सांगता येणार नाही कारण बाहेरील मार्ग सर्व बंद केल्या जातील. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारातून स्थानकावर जावे लागणार असल्याने भविष्यात यांना पाणी मिळणार नाही आणि नगर पालिका देणार नाही?…
विदर्भातील नेते जेव्हा रेल्वेने मुंबईला जातात तेव्हा AC मधून बाहेरील स्थानकावरच विदारक चित्र दिसते पण दिसताच परदा लावून घेतात. कारण विकास पुरुषांचा मतदार संघ असल्याने कोण काय बोलणार?. तशीच येथील जनता जागरूक नसून भोळी आहे, लोकप्रतिनिधीला डोक्यावर घेवून नाचतात त्यामुळे त्यांच्यासमोर बोलण्याची हिम्मत होत नाही. म्हणूनच पाण्यासाठी कधीही आंदोलन करणार नाहीत. “भाऊने बहोत विकास किया” असे म्हणत स्वताची समजूत काढतात, मात्र बायको पाण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाते…