रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील बोथिया पालोरा चे सरपंच सुधिर नाखले खखेर अपात्र घोषीत ठरले त्यांना कंत्राटदारांकडून लाच स्विकारणे महागात पडले. सुधीर नाखले यांनी १ लाख ३२ हजाराची लाच स्विकारली होती व त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते.सदर निर्णय विभागीय अप्पर आयुक्त डॉ माधवी खोडे यांनी दिला.
याबाबत माहिती अशी की, रोशन रहमत भट्टी हे शासकिय बांधकाम ठेकेदार आहे. तर सुधीर नाखले हे बोथिया पालोराचे सरपंच आहे. कंत्राटदार यांनी ग्रामपंचायतीची सिमेंट् कॉक्रीट रस्ते, नाल्या वगैर यासारखी ग्रामपंचायतीची कामे करण्याचे काम केले.
या कामाचा मोबदल्यातून ७ टक्के कमीशन घेण्याचे ठरले कामाचे रक्कम लक्षात घेता ८४ हजार इतके कमीशन देण्याचे ठरले परंतू तितक्यात नाखले मानत नसल्याने ४८ हजार पुन्हा मिळून १लाख ३२ हजार रपये देण्या घेण्याचे ठरले
कंत्राटदार रोशन भट्टी यांना सदर प्रकरणाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली व नाखले यांना रंगेहात पकडण्यात आली. सदर प्रकरण सुधीर नाखले विरुद्ध लाचलुचपत विभाग सद्या न्यायप्रविष्ठ आहे.
याबाबतची चार्ट शिट रोशन भट्टी यांनी घेवून सरपंच सुधीर नाखले हे भ्रष्टाचारी आहेत अशा प्रकारचे आरोप करीत नाखले यांचे विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ३९ (१) नुसार कारवाई करुन अपात्र घोषीक करावे अशी मागणी करणारी याचीका नागपूर विभागीय आयुक्त यांचे कडे केली त्यानुसार याबाबतची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश नागपूर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद नागपूर यांनी संपूर्ण चौकशी करुन याबाबचा अहवाल आसुक्तांना सादर केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर आयुक्तांनी नाखले यांना सुद्धा बाजू मांडण्याचा अधिकार दिला.
दोन्ही पक्षकारांची व त्यांचे वकिलांची बाजू ऐकून १६ ऑक्टोंबर रोजी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या़चा चौकशीअहवाल मान्य करीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ३९(१) अंतर्गत सुधीर नाखले यांना अपात्र घोषीत केले.