Hardik Pandya : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या पुढील सामन्यातून बाहेर पडू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकला बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये नेण्यात येईल, जिथे इंग्लंडचे तज्ज्ञ डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील. रिपोर्ट्सनुसार त्याला इंजेक्शन दिले जाणार आहेत. 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक लखनऊमध्ये भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे. तो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापनाला आहे.
हार्दिकला एनसीए बंगळुरूमध्ये बोलावण्यात आले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकला बंगळुरूला नेले जाईल, कारण त्याला एनसीएला रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे. दुखापतीनंतर हार्दिकला स्कॅनसाठी नेण्यात आले. नंतर तो संघात सामील झाला, पण तो संपूर्ण सामना खेळू शकला नाही. वैद्यकीय पथकाने त्याच्या घोट्याच्या स्कॅन अहवालाचे मूल्यांकन केले आणि इंजेक्शन घेतल्यावर तो बरा होईल असे वाटले. वृत्तानुसार, बीसीसीआयने इंग्लंडमधील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यांचेही तेच मत होते. अशा स्थितीत त्याला एका सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, या काळात संघ व्यवस्थापनाला त्यांची बदली आणि संघ संयोजन याबाबत खूप विचार करावा लागेल.
हार्दिकला दुखापत कशी झाली?
काल बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिकने लिटन दासचा फटका उजव्या पायाने रोखण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो चुकीच्या पद्धतीने डाव्या पायावर पडला. यानंतर, जमिनीवरून उठताना, त्याला खूप वेदना होतांना आणि लंगडत चालत होता. काही वेळातच फिजिओला मैदानावर बोलावण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोन वरिष्ठ खेळाडू होते. फिजिओ आल्यानंतर सुमारे पाच मिनिटे सामना थांबला. फिजिओने हार्दिकच्या डाव्या पायावर पट्टी लावली आणि पेन किलर स्प्रेही लावला, पण आराम मिळाला नाही. हार्दिकने उठून पुन्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण तो करू शकला नाही. अशा परिस्थितीत कोणताही विलंब न करता आणि कोणतीही जोखीम न घेता रोहितने हार्दिकला फिजिओसोबत मैदानाबाहेर पाठवले. तोपर्यंत हार्दिकने पहिल्या षटकातील तीन चेंडू टाकले होते. उर्वरित तीन चेंडू विराट कोहलीने टाकले. त्याने सहा वर्षांनंतर वनडेत गोलंदाजी केली.
सामन्यानंतर रोहित काय म्हणाला?
दुखापतग्रस्त हार्दिकच्या जागी विश्वचषक संघात अन्य कोणाचा समावेश करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार रोहितने सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात सांगितले होते की, दुखापत ही चिंतेची बाब नाही. तो म्हणाला, हार्दिक दुखापतीमुळे काळजीत आहे, पण काळजी करण्यासारखे काही नाही. शुक्रवारी सकाळपर्यंत त्यांची प्रकृती कशी आहे ते पाहू आणि त्यानंतर पुढील योजना करू. हार्दिक पांड्याच्या जागी संघात दोन बदल करावे लागतील. अश्विनला त्याच्या जागी खेळवलं तर तो योग्य फिरकी गोलंदाज आहे आणि शार्दुल ठाकूर आधीच संघात अष्टपैलू म्हणून खेळत आहे पण तो हार्दिकप्रमाणे फलंदाजी करू शकत नाही.
🚨 JUST IN: India have provided an injury update about Hardik Pandya.
— ICC (@ICC) October 20, 2023
Details ⬇️#CWC23https://t.co/foFQ0Or8zu