Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsसमृद्धी महामार्गावर मिनी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू...

समृद्धी महामार्गावर मिनी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू…

न्यूज डेस्क : जीवघेण्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही. आजही एक अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान झालेल्या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 22 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या वैजापूरजवळील आगर सायगाव येथे हा भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर एक ट्रक थांबलेला होता. पाठीमागून आलेल्या भरधाव खासगी मिनी बसने या बसला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की मिनी बस मधील 12 प्रवाशी ठार झाले, तर 20 ते 22 प्रवाशी जखमी झाले. अपघात रात्री 12.30 ते 12.45 वाजता झाला प्रवासी झोपलेलं असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात अत्यंत भीषण होता. अपघातामुळे बसचा चक्काचूर झाला. इतकेच नव्हे तर बसमधील सीट, बसमधील प्रवाशांचे सामान, लहान मुलांची खेळणी सर्व काही रस्त्यावर येऊन पडले. सर्व काही अस्तव्यस्त झालं.

ही मिनीबस बुलढाण्याहून येत होते. सैलानीला गेलेल्या भाविकांना ही खासगी बस येत होती. बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. त्यावेळी समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन ही बस आदळली. त्यामुळे बस उलटून हा भीषण अपघात झाला. या अपघातात 12 प्रवाशांसह एका बालकाचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच आधी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्य करतास पंचनामा करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: