आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्यात पुन्हा रेती चोरीचे प्रमाण वाढले असून त्यावर नियंत्रण आणणेकरिता महसूल विभागाने पथके तयार केली आहेत. ही पथके रेती चोरांवर नजर ठेवून आहेत. त्यातीलच एका पथकाला प्रशांत रामराव मुंडाले हा इसम आपल्या ट्रक मधून चोरीच्या रेतीची वाहतूक करीत असल्याची खबर मिळाली. त्यावरून संबंधित महसूल पथकाने रेल या ठिकाणी सापळा लावला. त्यानंतर रात्री ११.३० वाजता चे सुमारास रेती चोरटा व त्याचे वाहन पकडण्यात आले
हे वाहन पकडल्यानंतर त्याच्यावर योग्य ती लिखित कारवाई करण्यात आली. आणि सदर वाहन दहीहंडा पोलीस ठाण्याचे आवारात ठेवण्यात आले. ही कारवाई मंडळ अधिकारी अनिल बोईंबे, मनोहर अढावू, तलाठी बाळू मुळे, महेश सरकटे, राजेश बोकाडे व सुरक्षारक्षक विवेक हिंगणकर यांनी केली. या वाहनावर नियमानुसार दंड आकारण्याची वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे.