मूर्तिजापूर | उद्धट तालुका पुरवठा अधिकारी चैताली यादव यांच्या कार्यालयात गावखेड्यातील लोक जेव्हा शिधा पत्रिकासाठी जातात तेव्हा अपमानस्पद वागणूक देतात. त्यांची लोकांसोबत उद्धट वागणुकीबाबत अनेक तक्रारी आल्यात. तर मूर्तिजापूर तालुक्यातील विरवाडा येथील काही ग्रामस्थांनी याबात पुढाकार घेवून वरिष्ठ अधिकार्यांना तक्रारी केल्यात परंतु त्यावर तोडगा निघाला नसल्याने आज रोजी विरवाडा गावातील तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश महादेव डोंगरे व उपसरपंच संजय श्रीराम मेसरे यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच उपोषणाला बसले आहेत.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यालय येथे येऊन आम्हाला दिलेल्या अपमानास्पद वागणूक व आमच्यास ग्रामपंचायत कार्यालय मधून Get Out म्हणून मी एक महिला अधिकारी आहे माझ्या समोर बोलले तर तुमच्या विरुद्द FIR दाखल करणार असे उधाम पणाचे वक्तव्य करून आमचा अपमान केला आहे. त्या विरुद्ध आमरण उपोषणास बसणार असल्याचे सांगितले होते.
मौजे विरवाडा गावातील काही लोकांचे धान्य पुरवठा अधिकारी चैताली यादव यांनी पैसे घेऊन श्रीमंत लोकांचे कार्ड तयार करण्यात केले आहे. असे आमच्या निदर्शनात आले आहे. व आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी कडे तक्रार केली असता पुरवठा निरीक्षक चैताली यादव यांनी दी. ०५/०९/२०२३ ग्रा.प. विरवाडा येथे अंतोदय कार्ड चे चावडी वाचन करिता आल्या असता. त्यांनी कार्ड ची चौकशी न करता उडवा उडवी चे उत्तर दिले. त्यानंतर उपसरपंच व तंटामुक्त अध्यक्ष यांनी मॅडम ला गरीब लोकांची नावे सांगण्याकरिता उभे राहिले असता त्यांनी त्यांना ग्रामपंचायतच्या बाहेर काढून दिले व FIR ची धमकी दिली. व पूर्ण गावासमोर अपमानास्पद वागणूक दिली. सर्व गावातील लोकांसमोर बाहेर काढले आम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळे आमचा गावासमोर अपमान झाला असल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे. जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही वरिष्ठ पातळीवर चौकशी करून पुरवठा अधिकारी यांच्या वर कठोर कारवाही करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.