Tuesday, November 26, 2024
HomeBreaking Newsविवेकानंद शंकर पाटील यांची ३८६ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त...प्रकरण जाणून घ्या...

विवेकानंद शंकर पाटील यांची ३८६ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त…प्रकरण जाणून घ्या…

न्यूज डेस्क : शेतकरी कामगार पक्षाचे चार वेळा आमदार असलेले व मुंबई,पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांची आज दि. 12/10/2023 त्यांची जमीन, बंगला, निवासी संकुल इत्यादींच्या स्वरूपात 152 कोटी (अंदाजे) यासह एकूण 386 कोटी (अंदाजे) रुपयांची संपत्ती जप्त केलीय. या आधी ईडीने 234 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

विवेकानंद शंकर पाटील यांच्यावर 67 बनावट खात्यांद्वारे 560 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विवेकानंद शंकर पाटीलही चार वेळा आमदार राहिले आहेत. या प्रकरणी ईडीने त्याला 15 जून 2021 रोजी अटक केली होती. याबाबत ED ने सोशल मिडिया X वर पोस्ट करीत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे, ईडीने या प्रकरणी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. 2019-20 मध्ये, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, पनवेल मुंबई विरुद्ध लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणादरम्यान बँकेचे तत्कालीन अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांनी सदर बँकेतून बनावट खात्यांद्वारे पैसे काढून ते पैसे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीमध्ये जमा केल्याचे उघड झाले. या दोन्ही संस्था पाटील यांनीच निर्माण केल्या होत्या आणि त्यांचे नियंत्रणही होते, असा आरोप आहे.

बनावट खात्यांद्वारे फसवणूक

ही फसवणूक 2008 पासून सुरू असल्याचेही तपासादरम्यान उघड झाले. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत करण्यात आलेल्या तपासादरम्यान, 67 बनावट खात्यांद्वारे फसवणूक झाल्याचे उघड झाले आणि ही फसवणूक व्याजासह अंदाजे 560 कोटी रुपये होती. फसवणूक लपविण्यासाठी हे पैसे वेगवेगळ्या खात्यांद्वारे पाटील यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. या पैशाचा वापर क्रीडा संकुल, महाविद्यालये आणि शाळा यांसारख्या मालमत्ता निर्माण करण्यासाठी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी इत्यादी संस्थांद्वारे वैयक्तिक फायद्यासाठी केला गेला. मात्र आतापर्यंत ED ने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची 386 कोटींची संपत्ती जप्त केलीय.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: