टिटवाळा-कल्याण / प्रफुल्ल शेवाळे
टिटवाळा शहरातील अमित प्रभाकर साळी वय वर्ष 33 या तरुणाने तब्ब्ल 100 वेळेस प्लेटलेटेस दान केल्या आहेत.
अमितने रक्त दान सुद्धा तब्ब्ल 22 वेळेस केलं आहे. मूळचा जळगाव जिल्यातील हा तरुण सध्या टिटवाळा परिसरात स्थायिक असून एक सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून सदर कार्य करीत आहे…
2017 या वर्षी पासून आज दि. 11ऑक्टोबर रोजी तब्ब्ल 100 व्या वेळेस मुंबई च्या टाटा रुग्णालयात प्लेटलेट दान करण्याचा एक उपक्रम या तरुणाने केला आहे..मुख्य म्हणजे 17 वेळेस इतर रुग्णालयात आणि 83 वेळेस टाटा रुग्णालयात असं मिळून आजतागायत 100 वेळेस प्लेटलेट दान केलं आहे. टाटा रुग्णालयाने अमित ला या बद्दल प्रमाणपत्र बहाल केलं आहे..
कोरोना सारख्या भयंकर आजारामध्ये अनेक रुग्णांना प्लेटलेट ची कमतरता जाणवत होती.. अशातच अनेक रुग्णांना यामुळे आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे..
आपल्या रक्तदान आणि प्लेटलेट दान च्या माध्यमातून आपण कुठतरी फुल ना फुलाची पाकळी स्वरूपात एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा अगदी छोटासा प्रयत्न करतोय. अशा प्रकारची भावना अमित साळी या तरुणाने व्यक्त केली आहे..
टिटवाळा परिसरात अमितच्या या उपक्रमाकरीता टिटवाळा परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..
भविष्यात सुद्धा आपला हा उपक्रम सुरूच राहील आणि समाजातील तरुणांनी शक्य असे हे प्लेटलेट दान करून पहाच.. खूप मोठा आनंद मिळतोय असं अमित ने पुढे नमूद केलं आहे.
याबद्दल अधिक माहिती करिता अमित ने (मो. 9821532708)यावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे..