World Cup 2023 : आज मंगळवारी भारतात खेळल्या जाणार्या क्रिकेट विश्वचषकात दुसरा डबल हेडर आहे. ज्यामध्ये चाहत्यांना दोन शानदार सामन्यांचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. दिवसाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाला बांगलादेशचे आव्हान असेल. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
इंग्लंड पहिल्या विजयाच्या शोधात आहे
विश्वविजेत्या इंग्लंडची या स्पर्धेत विशेष सुरुवात झालेली नाही. गेल्या विश्वचषकातील उपविजेत्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी विशेषत: अपयशी ठरली. दुसरीकडे बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात होणारा सामना हिमाचलमधील धर्मशाला येथील स्टेडियममध्ये आयोजित केला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल.
पाकिस्तानला श्रीलंकेचे कडवे आव्हान असेल
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दुपारी २ वाजल्यापासून सामना रंगणार आहे. एकीकडे नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून पाकिस्तान सामन्यात प्रवेश करत आहे. श्रीलंकेच्या संघाला आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या सामन्यात लंकेच्या फलंदाजांनी ताकद दाखवली आणि ते पाकिस्तानसाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.
Two action-packed matches lined up 😍
— ICC (@ICC) October 10, 2023
Which teams will secure victory today? 👀#ENGvBAN | #PAKvSL | #CWC23 pic.twitter.com/0dXKVWQCkw