बुलढाणा – अभिमान शिरसाट
2 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या शेकाप चे जिल्हा अध्यक्ष रामेश्वर सुखदेव वायाळ व 80 वर्षीय वृद्ध शेतकरी रामदास पाटीलबा शिंगणे(आण्णा) यांच्या मौजे देऊळगाव मही येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 ए वर शेतामध्ये सुरू केलेल्या आमरण उपोषणाला 5 दिवसा नंतर सिंदखेड राजा SDO समाधान गायकवाड साहेब यांच्या पुढाकाराने सर्व मागण्या लेखी स्वरूपात पूर्ण झाल्या असून उपोषण कर्त्याना (SDO) सिंदखेड राजा यांच्या हस्ते ज्युस पाजून उपोषण हे थांबवन्यात आले आहे. त्यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी SDO गायकवाड साहेब, तहसीलदार दे राजा, शेकाप चे अॅड. दत्ता भाऊ भुतेकर, राष्ट्रीय महामार्ग अभियंता कचाले साहेब, तसेच विविध प्रभागातील प्रमुख अधिकारी तथा जवळपासच्या ग्रामीण भागातील सरपंच व ग्रामीण भागातील अनेक मान्यवर मंडळी सह जीवनभाऊ देशमुख, गजानन झाडोकर,संजय शिंगणे,प्रदीप हिवाळे,तेजराव मुंढे,
राजू खंडूजी शिंगणे, पिंटू शिंगणे,सीताराम शिंगणे, दिगांबर शिंगणे, समाधान तेजनकर, अशोक गुरव,रामदास तेजनकर, अरुण इंगळे, विष्णु गुरव, हरीश शिंगणे, आकाश शिंगणे, शुभम वायाळ तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.